गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता मानले जातात. गणेशोत्सव - आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे, परंतु या उत्सवाचा आनंद साजरा करताना, आपण नकळत आपल्या निसर्गाला वेदना देत असतो, हे लक्षात येत नाही. या सगळ्यामुळे आपल्या पवित्र नद्या प्रदूषित होतात. म्हणूनच.. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणं ही काळाची गरज आहे. हे कुठल्याही श्रद्धेच्या विरुद्ध नाही. तर श्रद्धेला एक शाश्वत, सजग आणि जबाबदार रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे चला....
या वर्षी निवडूया एक शाश्वत, पर्यावरणपूरक आणि पुन्हा वापरता येणारी "धातूची मूर्ती"! प्रदूषण होणार नाही... नद्यांचं रक्षण होईल आणि बाप्पाशी आपला ऋणानुबंध असेल कायमस्वरूपी